ही लक्षणे आढळल्यास असू शकतो कर्करोग कॅन्सर किंवा कर्करोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार. कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट वारंवार आपण कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या जाहिराती पाहतो. यात या प्रमुख दोन कारणामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असे सांगतात पण या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहे. जंक फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत. घड्याळ्याच्या काट्यांवर चालणारे धाकाधकीचे जीवन, त्यातून सकस आहार न मिळणे, ताण तणाव अशा अनेकही गोष्टी हळूहळू आपल्याला कर्करोगाच्या दरीत ढकलत असतात. हल्ली आपण इतके व्यस्त होतो कि आरोग्याची काळजी घ्यायला देखील आपल्याकडे वेळ नसतो. त्यातून या कर्करोगाबद्दल दुर्दैवी बाब म्हणजे या रोगाचे निदान व्हायला उशीर लागतो. ब-याच रुग्णालयाच्या बाबतीत कर्करोगाच्या दुस-या किंवा तिस-या टप्प्यात या रोगाचे निदान झाल्याचे देखील समजते. काही वेळा योग्य ते उपचार करून रुग्ण यातून बरा होता पण काहींच्या नशीबी मात्र मरण असते. पण कर्करोगाची लक्षणे आहेत जी लक्षणे तुम्हाला आढळली तर याचे योग्य वेळी निदान करून त्यावर वेळीच उपाय करू शकता. कर्करोगाची लक्षणे : स्तनात किंवा शरीरातील काही भागत गाठी तयार होणे. खोकला किंवा सतत घसा दुखणे दिर्घ काळापासूनची दुख तोंडातली बरी न होणारी जखम अन्न गिळताना त्रास होणे अचानक आवाजात बदल होणे लघवी किंवा मलातून रक्तस्त्राव होणे वारंवार चक्कर येणे किंवा भूक न लागणे वजनात अचानक घट होणे ही कर्करोगाची लक्षणे अगदी सामान्य असून, तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून निदान करून घेणे आवश्यक आहे. कर्करोगाबद्दल बरेच गैरसमज आहेत. त्याचे उपचार कसे केले जातात याबद्दल पुरेशी माहिती नसतानाच निव्वळ भीतीपोटी उपचार घेणं लोक टाळतात. उपचारांच्या दुष्परिणामांना घाबरून ते मध्येच सोडून दिले जातात. हे टाळलं तर आपल्याकडे ही कर्करोग उपचारांचा ‘सक्सेस रेट’ वाढू शकतो! कॅन्सर विषयी अधिक माहिती साठी किंवा उपचारासाठी संपर्क करा डॉ. प्रतीक पाटील ( कॅन्सर विशेषज्ञ ) कॉल करा 9637439163 किंवा भेटण्यासाठी नाव नोंदणी करा.