फुफ्फुसाचा कॅन्सर : जागरूकता , समज आणि गैरसमज

0
2K
Lung Cancer Blog
 

फुफ्फुसाचा कॅन्सर : जागरूकता , समज आणि गैरसमज

सध्याच्या जीनोमीक आणि इम्युनोथेरपी या कॅन्सर च्या आजारांवर प्रभावी पणे कार्य करणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. फुफ्फुसाचा कॅन्सर हा सर्वात सामान्य प्रकारचा कर्करोग मानला जातो. जगभरातील कॅन्सरच्या पाचपैकी एका रूग्णाचा मॄत्यू यामुळे होतो. दीर्घकालीन तंबाखू सेवन , धूम्रपान आणि नैसर्गीक कार्सीनोजेन च्या संपर्कामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. निश्चित पणे , थोरॅसीक आॉन्कोलॉजी मध्ये जे काम करतात त्यांना हे माहीत आहे की फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक धोकादायक आजार असू शकतो. परंतु सामान्य लोकांना जाणीव करून देण्यासाठी अथवा शिकवण देण्यासाठी याहून अधिक कार्य करणे आवश्यक आहे.

आरोग्य सेवेचे ओझे आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या दुष्परिणामांच्या संदर्भातील माहिती मध्ये मोठी तफावत असूनही, तंबाखूचा वापर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर यांच्यातील संबंधांबाबत ची व्यक्त होण्याची खुली मानसिकता यात अंतर पडते. या पार्श्वभूमीवर फुफ्फुसाचा कर्करोग असलेले अंदाजे १५ % रुग्ण कधीही धूम्रपान करत नसल्याची माहीती अस्तीत्वात असल्याचे आढळून येते. रूग्ण उपचार शोधण्यात टाळाटाळ करू शकतात , उपचार घेण्यास विलंब करु शकतात. आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत त्यांचा आजार प्रकट करण्यासाठी संकोच करु शकतात.

स्वनिरीक्षण - अत्यावश्यक बाब:

जे महिला-पुरूष स्पष्टपणे प्रत्यक्ष व प्रभावी धूम्रपान करतात आणि बहुतेक वेळा अप्रत्यक्षपणे धूम्रपान करतात , त्यांनी फुफ्फूसांच्या निगडीत जाणवत असलेल्या संकेतांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. आॉषोधोपचार असूनही खोकला , थुंकीतून रक्त पडणे , धाप लागणे , आवाजाच्या स्वरात बदल होणे आणि वजन नकळत कमी होत जाते , हे  प्रमुख स्वयंस्पष्ट संबंधीत संकेत आहेत. यातील बहुतेक संकेत दीर्घकाळ टिकून राहतात. आजार , हाडे आणि इतर अवयवांत पसरल्या नंतर वेदना होऊ लागल्याने रूग्ण तज्ज्ञांकडे खूप उशीराने पोहोचतात. ब्रॉन्कोस्कोपी किंवा स्कॅन , टिश्यु बायोप्सी द्वारे वेळेवर निदान करून घेतल्यास रोग नियंत्रणासाठी त्वरीत शोध आणि उपचारपद्धती ची मदत मिळू शकते.

सल्ला:

५० वर्षाच्या व्यक्तीने २० किंवा अधिक वर्षे दररोज एक पॅक धूम्रपान केल्याचा इतिहास असेल तर फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणारे म्रुत्यूचे प्रमाण २०% पेक्षा जास्त असते. या जीवघेण्या आजारापासून स्वतःला वाचवण्यासाठी आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर धूम्रपान कायमचे सोडून देण्याशिवाय कोणताही उत्तम पर्याय नाही.

समज - गैरसमज:
फुफ्फुसाचा कर्करोग फक्त धूम्रपान करणा-या मध्ये च दिसून येतो का ?
 
फुफ्फुसाचा कर्करोग चां धोका कमी करण्यासाठी कोणताही मार्ग नाही का ?
 
केवळ वृध्द व्यक्तीनाच फुफ्फुसाचा कर्करोग होतो का
 
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या धोक्या बाबतीत धूम्रपान करण्यापेक्षा प्रदुषित शहरात राहणे अधिक कारणीभूत आहे का ?
 
मी बराच काळ धूम्रपान केलेले आहे , आता थांबवण्यात काही अर्थ नाही ?
 
जर तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असेल तरीही तुम्ही धूम्रपान करू शकता ?
 
फुफ्फुसाच्या कर्करोगा च्या शस्त्रक्रिया मुळे कर्करोगाचा प्रसार होतो ?
 
फुफ्फुसाचा कर्करोग सतत होत राहतो ?
 
अॅन्टीआॉक्सीडंट सप्लीमेंटस फुफ्फुसाच्या कर्करोगा पासून संरक्षण करतात?
 
फुफ्फुसाच्या क्करोगासाठी धूम्रपान हा एकमेव घटक जोखमीचा आहे का ?
 
सरतेशेवटी :

फुफ्फुसाच्या कर्करोगाचा उपचार रूग्णाच्या प्रकारावर , स्टेजवर तसेच एकंदर आरोग्यावर अवलंबून असतो. संभाव्य उपचारांमध्ये आॅपरेशन , केमोथेरपी , रॅडीएशन , आणि इम्युनोथेरपी यांचा समावेश होतो. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांतील कोणाला सतत चिंतेची लक्षणं दिसत असल्यास , तुम्ही त्वरीत कॅन्सरच्या तज्ज्ञ ढाॉक्टरला भेट दिली पाहिजे.

– डाॅ. प्रतीक पाटील
कर्करोग तज्ञ
कन्सल्टंट, सह्याद्री हाॅस्पीटल
हेल्थ बे क्लिनीक, बाणेर

Search
Sponsored
Categories
Read More
Industry
Revolutionizing Ride Stability: Exploring the Benefits of Tire Balancing Beads for Cars and Trucks
In the ever-evolving landscape of automotive technology, innovations continually emerge to...
By Mk3 Industries 2024-03-21 07:19:08 0 1K
Other
Split Air Conditioner Deflector Market Global Industry Analysis and Opportunity Valuation and Forecast to 2031
  This Market Research report 2024-2031 is a valuable source of insightful information for...
By Akash Gaikwad 2024-04-04 11:29:04 0 766
Other
Python developer
Python is a highly demanded programming language to create web applications. The software...
By Naman Modi 2020-10-19 11:44:45 0 2K
Health
Medical Headwalls Market is driven by growing Healthcare Infrastructure
Medical headwalls are comprehensive medical gas delivery systems installed in hospitals and...
By Vaishnavi Cmi 2024-05-21 06:33:33 0 726
Other
Pharmaceutical Glass Packaging Market Aims to Expand at Double-Digit Growth Rate
A new report published by Persistence Market Research titled “Pharmaceutical Glass...
By Ajaykumar Patil 2022-12-09 21:35:27 0 2K